Wed, Aug 21, 2019 02:09होमपेज › Solapur › ज्ञान स्त्रोत केंद्रास पुस्तकांसाठी 75 लाखांचे अनुदान

ज्ञान स्त्रोत केंद्रास पुस्तकांसाठी 75 लाखांचे अनुदान

Published On: Jun 04 2018 11:55PM | Last Updated: Jun 04 2018 11:30PMसोलापूर : रणजित वाघमारे

सोलापूर विद्यापीठास रूसाकडून पुस्तक खरेदीसाठी 75 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे ग्रंथालय आणखी समृध्द होऊन विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या निधीतून सोलापूर विद्यापीठातील सहा संकुल, कायदा विभाग, आरोग्य केंद्र आणि अभ्यास केंद्रासाठी आवश्यक सर्व पुस्तके, ग्रंथ, नियतकालिके, बुक अँड जर्नल्सची  खरेदी होणार आहे. सध्या विविध संकुलांच्या संचालकांकडून आलेल्या मागणीप्रमाणे प्रशांत बुक एजन्सी, दिल्ली, पुणती बुक्स, जयपूर, युनिव्हर्सल बुक स्टॉल, पुणे, सुपर बुक्स सव्हिर्सेस, बंगळुरु आदींकडून 36 लाख 56 हजार 31 रूपयांची पुस्तक खरेदी केली आहेत.

उर्वरित पुस्तकांची मागणी व त्याची यादी त्या त्या विभागाच्या संचालकांकडून प्राप्त झाल्यानंतर 38 लाख  43 हजार 969 रूपयांची खरेदी लवकरच होणार आहे.  यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. वि. भा. घुटे आदी परिश्रम घेत आहेत. प्रशांत बुक एजन्सी-दिल्ली, थिंक टँक पब्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युटर-सोलापूर, युनिव्हर्सल बुक स्टॉल-पुणे, प्रशांत बुक हाऊस-जळगााव, मेहूल बुक सेल्स-पुणे, महावीर जनरल स्टोअर्स-सोलापूर, तेजोमय डिस्ट्रिब्युटर्स-सोलापूर यांच्याकडून पुस्तके खरेदी होणार आहेत.