Thu, Jan 24, 2019 16:03होमपेज › Solapur › सिद्धेश्‍वर महायात्रेत ६८ लिंगांचे तैलाभिषेक

सिद्धेश्‍वर महायात्रेत ६८ लिंगांचे तैलाभिषेक

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:22PM

बुकमार्क करा
सोलापूर ः प्रतिनिधी

प्रतिवर्षाप्रमाणे श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेला तैलाभिषेक करून प्रारंभ करण्यात आला.शुक्रवारी  68 लिंगांचे तैलाभिषेक करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक किरण देशमुख, सिद्धेश्‍वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी आदींची उपस्थिती होती. नंदीध्वजांचे पूजेचे मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सातही  नंदीध्वजांच्या मिरवणुकीस हिरेहब्बू वाड्यातून सुरुवात झाली. 

शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, प्रदीप हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, सूरज हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, ओंकार हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह   स्मृती शिंदे, सिद्धेश्‍वर देवस्थान कमिटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करण्यात आली. 

सिद्धरामेश्‍वरांनी शहरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना नंदीध्वज मिरवणुकीने शुक्रवारी दिवसभर तैलाभिषेक करण्यात आले. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू व मनोज हिरेहब्बू यांच्या हस्ते पहिल्या व दुसर्‍या नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. नंदीध्वजांची मिरवणूक हिरेहब्बू वाड्यातून सुरुवात झाली. तेथून दाते गणपती, राजवाडे चौक, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, सिद्धेश्‍वर प्रशाला, जिल्हाधिकारी कार्यालय गेट  या मार्गावरून होत सिद्धदेश्‍वर मंदिरातील प्रथम अमृतलिंगाला तैलाभिषेक केला. दिवसभरातून 68 लिंगांना यण्णीमज्जन (तैलाभिषेक) करण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत तैलाभिषेकाचा विधी पार पडला. त्यानंतर हे सातही नंदीध्वज हिरेहब्बू यांच्या वाड्यात दाखल झाले.