होमपेज › Solapur › आरटीईनुसार 602 विद्यार्थी प्रवेशास पात्र

आरटीईनुसार 602 विद्यार्थी प्रवेशास पात्र

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 10:34PMसोलापूर : प्रतिनिधी

बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येणार्‍या 25 टक्के जागेतून सोलापूर जिल्ह्यातील 351 शाळेत 602 विद्यार्थ्यांची निवड प्रवेशाकरिता ऑनलाईन सोडतीने झाली आहे. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 396 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला गेला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सोलापूर शहरातील काही शाळा टाळाटाळ करीत आहेत. या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

आरटीई कायद्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 351 शाळा पात्र आहेत. या शाळांत प्रवेशाकरिता निवड झालेल्या 396 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 32 विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळांनी नाकारले आहेत. 142 विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया देण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे दिसून येते. 

अक्‍कलकोट तालुक्यातील 17 शाळांत 19 विद्यार्थी प्रवेशाकरिता निवडण्यात आले आहेत. यापैकी 17 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. बार्शी तालुक्यात 27 शाळांत 51 विद्यार्थ्यांची निवड प्रवेशाकरिता करण्यात आली आहे. यापैकी 33 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. 

करमाळा तालुक्यात 30 शाळांत 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. माढा तालुक्यातील 45 शाळांत 57 विद्यार्थ्यांची प्रवेशाकरिता निवड करण्यात आली होती. यापैकी 49 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. 

माळशिरस तालुक्यातील 56 शाळांत 38 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी 23 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील 17 शाळांत 9 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी 6 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे. 

मोहोळ तालुक्यातील 15 शाळांत 43 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांना निवड करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील 53 शाळांत 80 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 39 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील 32 शाळांत 38 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी 37 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. 
उत्तर सोलापूर तालुक्यातील 22 शाळांत 47 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 29 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 17 शाळांत 26 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

यापैकी 14 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सोलापूर शहरातील क्रं. 1 च्या विभागातील 7 शाळांत 89 विद्यार्थ्यांची निवड प्रवेशाकरिता करण्यात आली होती. यापैकी 44 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. विभाग 2 मधील 13 शाळांत 78 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी 35 विद्यार्थ्यांना  12 मेपर्यंत प्रवेश देण्यात आला होता.