Tue, Mar 19, 2019 05:12होमपेज › Solapur › ऑनलाईन रेल्वे तिकिटावर 5 टक्के सूट!

ऑनलाईन रेल्वे तिकिटावर 5 टक्के सूट!

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:25PMसोलापूर : प्रतिनिधी

ऑनलाईन रेल्वे तिकीट काढून भीम अ‍ॅप किंवा यूपीआयवरून रक्कम जमा केल्यास तिकिटाच्या रकमेत 5 टक्के तात्काळ सवलत मिळणार आहे. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम सुरु केला आहे.

प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस) किंवा राखीव काऊंटरवर तिकीट काढल्यास मूळ भाड्याच्या एकूण किमतीच्या 5% सूट मिळेल.   यूपीआय- भीम अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट दिल्यावरच ही सवलत देण्यात येणार आहे. रेल्वेकडून नियम व अटी देखील लावण्यात आले आहेत. म्हणजे तिकिटांची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त असल्यास प्रवाशांना  सवलत मिळू शकेल. 100 रुपयांपेक्षा कमी तिकिटावर कोणतीही सूट मिळणार नाही. तिकीट काऊंटरवर व आरक्षण केंद्रांवर क्रेडिट आणि डेबिट कार्डासाठी  पॉस मशीन्स आहेत. भारतीय रेल्वेने भारतीय रेल्वेच्या विविध स्थानांवर 10,000 पॉईंट-सेल (पीओएस) मशीन्स स्थापित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत जोडली आहे. ट्रेन तिकिटे मिळण्यासाठी डिजिटल देयके वाढत आहेत.

कॅशलेसला चालना
पीएमओ कार्यालयाकडून कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी शासकीय कार्यालयाना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून भीम अ‍ॅप व यूपीआयच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.