होमपेज › Solapur › निरायम आरोग्यधाम संस्थेची  ५.५५ लाखांची फसवणूक

निरायम आरोग्यधाम संस्थेची  ५.५५ लाखांची फसवणूक

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 8:58PMसोलापूर : प्रतिनिधी

निरामय आरोग्यधाम समाजसेवी संस्थेच्या चेकवर डॉक्टर सचिवाची बनावट  सही करून खात्यातून 5 लाख 55 हजार 150 रुपये काढून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र बँकेच्या कर्मचार्‍यासह दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. भालचंद्र वासुदेव किणीकर (वय 70, शेळगी रोड, रविवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली असून ऑफीसबॉय सागर धायगुडे व बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नवी पेठ येथील संबंधित कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरायम आरोग्यधाम समाजसेवी संस्थेचे डॉ. भालचंद्र किणीकर हे सचिव  होते. 1 जून 2016 ते 10 मार्च 2017  याकालावधीत  संस्थेच्या ऑफिसमधील ऑफीसबॉय सागर धायगुडे याने डॉ. किणीकर हे संस्थेचे सचिव असताना त्यांची बनावट सही करून त्यावर संस्थेचा शिक्‍का न मारता बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचार्‍याला हाताशी धरून संस्थेचे 5 लाख 55 हजार 150 रुपये काढून संस्थेची फसवणूक केली म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या घटनेंसंदर्भात आधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पांढरे तपास करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. मारहाण करणार्‍याविरुद्धगुन्हा दाखलपोलिस मुख्यालयाशेजारी भगवाननगर झोपडपट्टीत यादगिरी व्यंकटय्या चिलवेरी (वय 50) यास मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मण बुगप्पा कस्सा (रा. भगवाननगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यागगिरी चिलवेरी, त्यांची पत्नी व मुलगा हे सोमवारी सकाळी दवाखान्यात जाताना लक्ष्मण कस्सा यास मी सध्या अडचणीत आहे, तुझ्या जावयाला व मुलीला फोन करून मला पैसे पाठविण्यास सांग असे चिलवेरी यांनी सांगितले. 

त्यावेळी कस्सा याने चिलवेरी यांना मारहाण करून पत्नी व मुलालादेखील मारहाण करून जखमी केले म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात जेलरोड पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार टंगसाळी तपास करीत आहेत.