Tue, Mar 26, 2019 07:37होमपेज › Solapur › आषाढीसाठी 3500 पोलिसांची फौज तैनात

आषाढीसाठी 3500 पोलिसांची फौज तैनात

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:16PMपंढरपूर :  प्रतिनिधी

 वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठू - रुखमाईच्या दर्शनासाठी येणार्‍या असंख्य भक्ताच्या स्वागतासाठी पंढरी सज्ज होत आहे. यात्राकाळात कोणाताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍यांची आषाढीसाठी मोठी फौज बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे.

राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदित आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढीवारीला किमान 12 ते 15 लाख वारकरी उपस्थितीत राहतील, असा पोलिस प्रशासनाचा अंदाज आहे. आषाढीसाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे तीन हजार पाचशे पोलिस कर्मचारी व अधिकारी पंढरपुरात येत आहेत. वाळवंट, विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मठ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा सलग तीन ते चार दिवस खडा पहारा देऊन भाविकांची काळजी घेत असतात. यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

आषाढी एकादशी सोहळा 8 दिवसांवर आला असून, पंढरीत वारकर्‍यांची  गर्दी होऊ लागली आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 4 अप्पर पोलिस अधिक्षक , 8 डी.वाय. एस.पी. , 3 वाहतूक डीवायएसपी , 31 पोलिस निरीक्षक , 13 वाहतूक पोलिस निरीक्षक ,127 उपनिरीक्षक , 45 वाहतूक उपनिरीक्षक , 3500 पोलीस कर्मचारी, 375 वाहतूक पोलिस कर्मचारी,  500 महिला पोलिस, 35 आर.टी. पी.सी. , 2500 होमगार्ड , 3 एस.आर.पी.एफ. , 3 बी.डी. डी.एस., तसेच बॉम्बशोध पथक व  नाशक पथक आहे. शहरात कार्यरत असलेला पोलिसांचा असा फौजफाटा बंदोबस्तासाठी आहे. खबरदारी म्हणून जी पथके नेमली आहेत, ती शहरातून फिरून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. वाखरी पालखीतळ बंदोबस्त तसेच पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत. असे शहर पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले.