Thu, Aug 22, 2019 13:04होमपेज › Solapur › आज चैत्री यात्रा सोहळा; दर्शन रांगेत 35 हजार भाविक दाखल 

आज चैत्री यात्रा सोहळा; दर्शन रांगेत 35 हजार भाविक दाखल 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

चैत्री यात्रा एकादशीचा आज मुख्य सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता राज्याच्या कानाकोपर्‍यांतून आलेल्या एक लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याने पंढरीनगरी दुमदुमली आहे. 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर गजबजला असून दर्शन रांगेत 35  हजार भाविक दाखल झाले आहे. दर्शन रांग सायंकाळी 7 वाजता भुतेश्‍वर मंदिरापर्यंत गेली होती.
चैत्री याकरिता आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसर गजबजला आहे. मठ, मंदिर, धर्मशाळा, संस्थाने आदीमधून भजन, कीर्तन, प्रवचन सुरु आहेत. यात्रेकरिता येणार्‍या भाविकांना  अत्यावश्यक सेवा सुविधा प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात आल्या आहेत.  65 एकर येथे 4 प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट या ठिकाणीही प्रथमोपचार केंद्र, शौचालये, शुध्द पिण्याचे पाणी, वीजेची व्यवस्था करण्यात आली आहे.

चैत्री यात्रेकरीता राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच परराज्यातून भाविक दाखल होत असल्याने दर्शन रांगेतून दर्शन घेण्यावर भर दिला जात आहे. त्यामूळेच दर्शन रांग सोमवारी सायंकाळी 7 वाजता भुतेश्‍वर मंदीर या ठिकाणी पोहचली आहे. मंदीर समितीच्यावतीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पत्राशेड येथे कायमचे तीन व तात्पुरते तीन असे 6 दर्शन  शेड उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेत पिण्याचे शुध्द पाणी, वीज, प्रथमोपचार केंद्र व सीसीटीव्हीची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  खिसे कापूपासून भाविकांचे संरक्षण करण्याकरीता साध्या वेशात पोलीस सेवा बजावत आहेत. एसटी महामंडळाच्यावतीने भाविकांसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. साफसफाई करण्याकरीता कायमस्वरुपी व तात्पुरते असे एकूण  1100 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Tags : Solapur, Solapur News, 35 thousand, devotees, Darshan queue


  •