Wed, Aug 21, 2019 01:59होमपेज › Solapur › तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यास 311 कोटींचा निधी

तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यास 311 कोटींचा निधी

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 11:13PM

बुकमार्क करा
होटगी : प्रतिनिधी

आधीच्या सरकारने सरकारी तिजोरीचा विचार न करता भरमसाठ योजना मंजूर करून ठेवल्या. पैशाअभावी अनेक ठिकाणी कामे रेंगाळली. अशा योजना पूर्ण करण्यासाठी ना. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी 311 कोटी रूपये मंजूर केले. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 28 कोटी रूपये जिल्ह्याला दिल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. 

ते मंद्रुप येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या पाणीपुरवठा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी ना. सुभाष देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पं.स. सभापती ताराबाई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तहसीलदार अमोल कदम, भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जि.प. सदस्य अण्णाराव बाराचारे आदी उपस्थित होते. 

ना. लोणीकर म्हणाले की, मंद्रुपकरांना आता स्वच्छ श्ाुध्द पाणी मिळणार आहे. पूर्वीच्या सरकारने अश्ाुध्द पाणी पाजले आणि त्यामुळे अनेकांचे डोक्यावरील केस गेले. आता यापुढे असे होणार नसून आगामी काळात सर्वांना शुध्द पाणी मिळणार असून सर्वांचे केस शाबूत राहणार असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

याप्रसंगी ना. सुभाष देशमुख बोलताना म्हणाले की, आता खोटे बोलायचे दिवस राहिलेले नाहीत. आता काम करायचे दिवस आहेत. दोन वर्षांत या योजनेचे काम पूर्ण करायचे असून गुणवत्तेचे काम करून घेण्याचे आवाहन गावकर्‍यांना केले. लवकरच मंद्रुपला अतिरिक्‍त तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. मंद्रुप एमआयडीसी प्रकरणी प्रारूप आराखडा तयार करून त्याला 16 एमएलडी पाणी उपलब्ध करून देऊन एमआयडीसी  सुरु करण्यात येत आहे. या माध्यमातून आपल्याला उपतालुका निर्मितीसाठी पोषक राहणार असल्याचे सांगितले. 

प्रारंभी औद्योगिक वसाहतीजवळील नियोजित जागेवर कोनशिलेचे अनावरण ना. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मळसिध्द मुगळे, सूर्यकांत ख्याडे, गौरीशंकर मेंडगुदले, सरपंच विश्‍वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, भीमाशंकर नरसगोंडे, सुशीला ख्यामगोंडे, सुरेश बगले, महेश मेंडगुदले, संतोष बरूरे, दत्तात्रय देशमुख, यल्लव्वा रगटे, दत्तात्रय देशमुख, हेमंतकुमार स्वामी, नितीन रणखांबे, सविता कांबळे, सोमनिंग मुगळे, सोनी कन्स्ट्रक्शनचे श्रीकांत सोनी, राहुल सोनी, अतुल सोनी आदी उपस्थित होते.