Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Solapur › जि.प. प्रशासनातील 27 कर्मचार्‍यांच्या बदल्या

जि.प. प्रशासनातील 27 कर्मचार्‍यांच्या बदल्या

Published On: Aug 05 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 10:33PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन विभागात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणार्‍या 27 कर्मचार्‍यांच्या बदल्या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार केल्या असल्याची माहिती जि.प. प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी दिली.

आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी एम.एस. रुपनर यांची प्राथमिक शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक पदावरील पाचजणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 
शिक्षण विभागातील एन.एन. भोसले यांची सामान्य प्रशासन जि.प. क्र.1 येथे बदली झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एस.एम.शेतसंदी यांची प्राथमिक शिक्षण विभागात बदली झाली आहे. बांधकाम विभाग 1 मधील दयानंद परिचारक यांची प्राथमिक शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. बांधकाम विभाग 1 मधील आर.एम. मनलोर यांची आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे, तर साामान्य प्रशासन विभागातील एस.एस. म्हेत्रे यांची बांधकाम विभाग 1 येथे बदली करण्यात आली आहे. 

कनिष्ठ सहायक पदावरील 21 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उत्तर सोलापूर एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील जे.बी. भोसले यांची प्राथमिक शिक्षण विभाग सोलापुरात बदली करण्यात आली आहे. उत्तर पंचायत समितीमधील एस.यु. आंबेकर यांची प्राथमिक शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. 

प्राथमिक शिक्षण विभागातील जी.टी. रेवे यांची बदली आरोग्य विभागात करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील अपंग कर्मचारी आर. के. चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. एम.एस. राठोड, पी.जी. सुरवसे यांचीही बदली  करण्यात आली आहे. व्ही.व्ही. जाधव यांची बदली सामान्य प्रशासन विभाग 1 येथे करण्यात आली आहे. एस.पी.साळुंखे यांची बदली दक्षिण सोलापूर पंचायत समिती येथे करण्यात आली आहे. एस.एस. इंगळे यांची ग्रामीण पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. 

महिला व बालकल्याण विभागातील ए.बी. पवार यांची प्राथमिक शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागातील एस.एस. टकले यांची महिला व बालकल्याण विभागात बदली करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील पी.बी. सुपेकर यांची बदली प्राथमिक शिक्षण विभागात करण्यात आली आहे. ए. के. वाघमारे यांची बदली पंचायत समिती उत्तर सोलापूर येथे करण्यात आली आहे. 

बांधकाम विभाग 1 मधील ए.व्ही. माळी यांची बदली उत्तर सोलापूर एकात्मिक बालविकास सेवा योजनेत झाली आहे. लघुपाटबंधारे विभागातील पी.आर. बनसोडे यांची बदली सामान्य प्रशासन विभाग 1 येथे करण्यात आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील एम.एस. सुतार यांची बदली लघुपाटबंधारे विभागात करण्यात आली आहे. 

दक्षिण सोलापूर पंचायत समितीमधील व्ही.एल. शेलार यांची बदली पशुसंवर्धन विभागात, तर टी.एल. होटकर यांची बदली प्राथमिक शिक्षण विभागात करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागातील डी.बी. माने यांची बदली प्राथमिक शिक्षण विभागात करण्यात आली आहे.