Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Solapur › २६/११ तील वीरपुत्रांना सोलापुरामध्ये आदरांजली

२६/११ तील वीरपुत्रांना सोलापुरामध्ये आदरांजली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

मुंबईत  २६/११ रोजी दशहतवादी हल्‍ल्यात वीर मरण आलेल्या हुतात्मांना विविध संघटनांकडून आदरांजली वाहण्यात आली. फौजदार चावडी पोलिस स्टेशन, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, व डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद या विविध संघटनेच्यावतीने फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये आदरांजली वाहण्यात आली.

प्रारंभी फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे पी. आ. संजय जगताप यांच्याहस्ते वीर हुतात्मांना व तात्कालिन पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पो. नि. जगताप यांनी या वीरपुत्रांची प्रेरणा घ्यावी असे मत व्‍यक्‍त केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सदाशिव पवार, पंजाबराव शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जीवन यादव, दत्तामामा मुळे, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा अभिंजली जाधव, जिल्हाध्यक्षा निर्मला शेळवने, माजी जिल्हाध्यक्षा लता ढेरे यांनीही आपल्या मनोगतातून वीर जवानांना आदरांजली वाहिली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुहास डोके, अविनाश फडतरे, श्रीकांत सराटे, सचिन मोरे, नितिन चव्हाण, चेतन चौधरी, शिल्पकार नितिन जाधव, गोवर्धन गुंड, राजू जाधव, हणुमंत पवार, अंबादास सपकाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या वर्षा मुसळे, मार्था असादे, स्वाती पवार, फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे एपीआय चिंताकिंदी एएसआय गवळी, एस. सी. शिंदे, विनोद रजपूत, दादा सरवदे, राजू मुदगल, आयबीचे शिंदे व डिबी पथक व ऑॅफिस कर्मचारी उपस्थित होते.