Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Solapur › मंगळवेढा तालुक्यात २ वर्षात २३३ वाळू तस्करांवर गुन्हे; मुख्यमंत्र्यांची माहिती

मंगळवेढा तालुक्यात २ वर्षात २३३ वाळू तस्करांवर गुन्हे; मुख्यमंत्र्यांची माहिती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

पंढरपूरचे नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणातील आरोपी पोलिसांनी निश्‍चित केले असून मंगळवेढा तालुक्यात दोन वर्षात 233 वाळू तस्करांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत तर 29 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

सोमवारी विधानसभेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेल्या चर्चे दरम्यान पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी पंढरपूरसह मंगळवेढा तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय उपस्थित केला होता.यावेळी आ. भालकेंनी पंढरपुरात झालेल्या खुनांसह मंगळवेढा तालुक्यातील पोलिसांची लाचखोरी, पिस्तूल चोरी आणि तिचा गैरवापर, अडीच वर्षानंतरही शाळकरी विद्यार्थ्यांचे मारेकरी न सापडणे, वाळू तस्करीचे प्रश्‍न उपस्थित केले होते. या सर्व प्रश्‍नांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, आ. भारत भालके यांनी नगरसेवकांच्या हस्तेसंदर्भात विषय मांडला होता. त्यातील जे आरोपी आहेत ते निष्पन्न झालेले आहेत. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील वाळू माफीयाचाही विषय मांडला होता. यासंदर्भात 2016 मध्ये 66 तर 2017 मध्ये 170 आरोपींविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 29 आरोपींना अटकही करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्तही करण्यात आलेला असून वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे.  मात्र उत्तरामध्ये अमीर मुलाणी हत्येप्रकरणातील आरोपी, नामदेव भुईटे हत्या प्रकरणासह पोलिसांने पिस्तुल चोरून केलेल्या गैरवापरासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही काहीही खुलासा केलेला नाही असे दिसून येते. 

Tags ; Solapur, Solapur News, sand, smuggling case, two years, Mangalwedha taluka


  •