Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Solapur › दलित वस्ती सुधार योजनेसाठी २३ कोटींचा निधी 

दलित वस्ती सुधार योजनेसाठी २३ कोटींचा निधी 

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:28PMसोलापूर ः प्रतिनिधी

 जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधार योजनेतून घेण्यात येणार्‍या 692 कामांसाठी 23 कोटी 51 लाख रुपयांचा निधी खर्चास समितीची मान्यता देण्यात आल्याची माहिती समाजकल्याण समितीच्या सभापती शिला शिवशरण यांनी दिली. 

सभापती शिवशरण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी समितीचे सदस्य शिवाजी सोनवणे, सुनंदा फुले, संगिता धांडोरे, अंजनादेवी पाटील, अतुल खरात, शोभा वाघमोडे, रेखाताई गायकवाड, साक्षी सोरटे, आण्णाराव बाराचारे, प्रभावाती पाटील, कविता वाघमारे आदी उपस्थित होते. 

जि. प. समाजकल्याण विभागाकडून घेण्यात येणार्‍या दलित वस्ती सुधार योजनेसाठी यापुर्वी 1441 प्रस्तावांच्या कामांकरीता 43 कोटी 17 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या योजनेसाठी एकूण 66 कोटी 68 लाख रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. 

मार्च अखेर पर्यंत मंजूर केलेल्या कामावर निधी खर्च करण्याचा नियोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

वैयक्‍तिक लाभाच्या योजनेसाठी प्रस्ताव आलेल्या अर्जाना यावेळी मान्यता देण्यात आली. समाजकल्याण विभागाचा कारभार गतीमान व पारदर्शक करण्याचे आदेश यावेळी सभापती शिवशरण यांनी दिले. 

कांही अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बाबतीत सातत्याने तक्रारी येत असून अशा अधिकार्‍यांनी किंवा कर्मचार्‍यांनी त्यांचे काम न सुधारल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याची भुमिका यावेळी घेण्यात आली. 

समाजकल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी विजय लोंढे यांच्याविरुध्द स्थायी समितीत जि.प.सदस्यांनी आवाज उठविला होता. समाजकल्याण समितीतही लोंढे यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात आली. मात्र समाजकल्याण अधिकारी म्हणून अन्य कोणता अधिकारी पर्याय नसल्याने पदाधिकारी व सदस्यांकडून यावेळी लोंढे यांच्याविरोधातील रोष मागे घेण्यात आल्याचे यावेळी दिसून आले.