होमपेज › Solapur › रस्त्यांच्या कामासाठी 217 कोटी मंजूर : आ. शिंदे

रस्त्यांच्या कामासाठी 217 कोटी मंजूर : आ. शिंदे

Published On: Mar 14 2018 12:48AM | Last Updated: Mar 13 2018 10:46PMटेंभुर्णी : प्रतिनिधी 

माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 10 ठिकाणच्या रस्त्यांच्या कामासाठी 217  कोटी रु. मंजूर झाले असून यातील हायब्रीड अन्यूईटी योजनेंतर्गत होणार्‍या सालसे-कुर्डुवाडी-माढा-यावली या 66 कि.मी. रस्त्यासाठी 196 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.

आ. शिंदे म्हणाले की, रस्त्याच्या कामासाठी शासनकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खूपच खराब झालेली आहे. यासाठी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेली होता. सध्याच्या बजेटमध्ये मंत्रिमहोदयांनी आपल्या नियोजित मागणीच्या रस्त्यांच्या कामासाठी मंजुरी दिलेली आहे व पुढीलकाळातदेखील रस्त्यांच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\

आ. शिंदे म्हणाले की, 2018-19 या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये माढा तालुका व विधानसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या माळशिरस, पंढरपूर तालुक्यांतील एकूण 9 रस्त्यांचा समावेश असून यासाठी 20 कोटी 60 लाख रुपये मंजूर झाले आहेत. 1) गारअकोले-टाकळी (टें) ते आढेगाव रस्ता मजबुतीकरण करणे (1 कोटी 50 लाख रुपये), 2) रिधोरे-तांदूळवाडी-सुलतानपूर-जामगाव रस्ता सुधारणा करणे (1कोटी 83 लाख रुपये), 3) माढा-वडशिंगे ते पापनस रस्ता सुधारणा (2 कोटी 25 लाख रुपये), 4) अकोले खु. ते कन्हेरगाव व निमगाव-ढवळस-चौभेपिंपरी ते कव्हे रस्ता सुधारणा (3 कोटी 13 लाख रुपये), 5) टेंभुर्णी ते बेंबळे रस्ता 6.00 ते 9.500 कि.मी. (1 कोटी 44 लाख रुपये), 6) वेळापूर-माळखांबी-नेवरे(वे) ते उंबरे(वे) रस्ता सुधारणा करणे (5 कोटी रुपये), 7) उंबरे (पागे)-करकंब-बार्डी-आष्टी रस्ता सुधारणा करणे ( 3 कोटी रुपये), 8) महाळुंग ते श्रीपूर सेक्शन 15 ते नेवरे रस्ता सुधारणा करणे (94 लाख रुपये), 9) उपळवाटे-दहिवली-कन्हेरगाव ते वेणेगाव रस्ता सुधारणा करणे (94 लाख रुपये), 10) हायब्रीड अन्यूईटी अंतर्गत सालसे-कुर्डुवाडी-माढा ते यावली 66 कि.मी. (196 कोटी 50 लाख रुपये).