होमपेज › Solapur › माढा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 20 कोटी

माढा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 20 कोटी

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 8:46PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुका व माढा मतदार संघातील पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाकरिता 20 कोटी 18 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. बबनदादा शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाने गेल्यावर्षापासून केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची निर्मिती केली असून ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण मार्गावरील खराब रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडून वेळेवर निधी मिळत नाही. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा वरचेवर खालावत चाललेला आहे. रस्ते अत्यंत नादुरुस्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने माढा तालुका व माढा मतदारसंघातील रस्त्यांना निधी मिळावा, यासाठी आ. बबनदादा शिंदे यांनी शासनाकडे  वारंवार मागणी करून पाठपुरावा सुरू केलेला होता.

माढा तालुका व माढा मतदारसंघातील मंजूर झालेल्या दुसर्‍या टप्प्यामध्ये माढा तालुक्यातील मानेगाव-मालवंडी रस्ता ते हटकरवाडी-कापसेवाडी ते धानोरे रस्ता 5.900 किमी (रक्कम रू. 3 कोटी 91 लाख), चिंकहिल ते तडवळे रस्ता 5.000 किमी (रक्कम रू. 2 कोटी 61 लाख), बेंबळे ते  मिटकलवाडी रस्ता 4.400 किमी (रक्कम रू.2 कोटी 98 लाख), टेंभुर्णी ते चव्हाणवाडी (टें.) रस्ता 4.700 किमी (रक्कम रू. 2 कोटी 75 लाख) तर माळशिरस तालुक्यातील विठ्ठलवाडी-खटकेवस्ती-जांभूड-नेवरे ते कोंडारपट्टा रस्ता 8.400 किमी (रक्कम रू.6 कोटी 37 लाख) तर पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे-अंबिकानगर ते चिंचोली भोसे रस्ता किमी 2.400 (रक्कम रू. 1 कोटी 54 लाख) या रस्त्यांचा समावेश असून कंसात नमूद केल्याप्रमाणे मंजूर निधीमधून या रस्त्याची नवीन कामे व पुढील 5 वर्षे देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे. सदर रस्त्याची कामे लवकरच सुरू होतील.