Mon, Jun 24, 2019 21:32होमपेज › Solapur › टेंभुर्णीजवळ अपघातात वाखरीचे दोन युवक ठार

टेंभुर्णीजवळ अपघातात वाखरीचे दोन युवक ठार

Published On: May 10 2018 3:22PM | Last Updated: May 10 2018 3:22PMपंढरपूर : प्रतिनिधी 

टेंभुणी पंढरपूर रोडवर झालेल्या अपघातात वाखरी येथील दोन तरुण जागीच ठार झाले. आज दुपारी १२च्या दरम्यान हा अपघात झाला. कार आणि दुचाकीच्या अपघातात मोटारसायकल चक्काचूर झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  टेंभुर्णी - पंढरपूर रोडवरील अकोले बु. ( ता. माढा ) येथे कार आणि दुचाकी यांच्यात सामोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील सागर शरद माने (वय २३) आणि सुहास दादासाहेब शिंदे (वय २४) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरुन टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे निघाले होते. 

अपघातानंतर दोघांचेही मृतदेह टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच वाखरीत हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.