Wed, Feb 20, 2019 08:41होमपेज › Solapur › संदीप पवार खूनप्रकरणी २ संशयितांना अटक

संदीप पवार खूनप्रकरणी २ संशयितांना अटक

Published On: May 25 2018 1:21AM | Last Updated: May 25 2018 1:21AMपंढरपूर : प्रतिनिधी

येथील नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपी एकनाथ शिंदे (रा. पुणे) व बबलू शिंदे (रा. सोलापूर) यांना पोलिसांनी अटक केली. गुरुवारी विशेष मोक्‍का न्यायालयापुढे त्यांना हजर केले असता न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी दोघांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नगरसेवक संदीप पवार याचा धारदार शस्त्रांनी गुडीपाडव्या दिवशी सपासप वार करुन खून केला होता. या खून प्रकरणातील आतापर्यंत आरोपींची संख्या 21 झाली आहे.  या प्रकरणातील फरार आरोपी एकनाथ शिंदे (रा. पुणे) व बबलू शिंदे (रा. सोलापूर) यांना पोलीसांनी अटक केली. या दोन आरोपींना अटक करुन पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात न्यायाधीश जे.टी. उत्पात यांंच्यापुढे हजर केले असता आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, गुन्ह्याच्यावेळी अंगावर वापरलेली कपडे जप्त करावयाची आहेत.

बबलू शिंदे हा यापुर्वी गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर बाहेर आल्यावर त्याने हा गुन्हा केला आहे. आरोपींनी गुन्ह्याचा कट कोठे रचला.  इतर आरोपींचा ठावठिकाणा घ्यावयाचा असल्याची बाजू पोलीसांनी मांडून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली होती.  विशेष मोक्का न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेवून 31 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आरोपींतर्फे अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर मोरे, अ‍ॅड. तुषार चव्हाण, अ‍ॅड. अनय कुलकर्णी यांनी काम पाहिले.