Wed, Sep 19, 2018 12:54होमपेज › Solapur › विकासनगरात दोन लाखांची घरफोडी

विकासनगरात दोन लाखांची घरफोडी

Published On: Dec 24 2017 1:47AM | Last Updated: Dec 23 2017 9:48PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

होटगी रोडवरील विकासनगरातील बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने रोख रक्‍कम व सोन्याचा ऐवज असा 2 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अमित गंगाधर डोंगरकर (वय 39, रा. विकासनगर, ब्लॉक नं. 19,  उत्कर्ष बंगला, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमित डोंगरकर हे शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घराचा दरवाजा बंद करून बाहेर गेले होते. ते दुपारी दोनच्या सुमारास परत घरी आले. त्यावेळी त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने डोंगरकर यांच्या घराच्या बंद दरवाजा बाहेरून ढकलून त्याचा कडीकोयंडा मोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील ड्रॉव्हरमधील रोख रक्‍कम व सोन्याचे दागिने असा 2 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.