Sat, Jul 20, 2019 13:07होमपेज › Solapur › सोलापूर : अपघातात लग्‍नावरून परतणारे २ तरुण ठार

सोलापूर : अपघातात लग्‍नावरून परतणारे २ तरुण ठार

Published On: Feb 03 2018 12:22AM | Last Updated: Feb 03 2018 12:22AMसोलापूर : पुढारी ऑनालाईन

गुलबर्गा येथे लग्‍नासाठी जाऊन परतणारे दोन तरुण कार अपघातात जागीच ठार झाले. शुक्रवारी मध्यरात्री आळंद गुलबर्गा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. मोईब कोतकुंडे व समी (दोघे रा. जमखंडी पूल, जोडबसवन्‍ना चौक, सोलापूर) अशी मृत झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.

लग्‍नावरून परतताना भरधाव कारने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. यात मोईब व समी हे दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच मृतांचे कुटुंबीय गुलबर्ग्याकडे रवाना झाले आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गुलबर्गा येथील शासकीय रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहेत.