Sun, Feb 17, 2019 07:11होमपेज › Solapur › दलित वस्ती सुधार योजनेतील 16 कोटीच्या कामांना मंजुरी 

दलित वस्ती सुधार योजनेतील 16 कोटीच्या कामांना मंजुरी 

Published On: Mar 10 2018 10:37PM | Last Updated: Mar 10 2018 10:17PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेला प्राप्‍त असलेल्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 545 कामांसाठी 16 कोटी 79 लाख रुपयांच्या कामांना समाजकल्याण समितीची मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती शीला शिवशरण यांनी दिली. 

सभापती शिवशरण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दलित वस्ती सुधार योजनेसाठी समाजकल्याण विभागास एकूण 54 कोटी रुपयांचा निधी प्राप्‍त आहे. यापैकी 9 कोटी 52 लाख निधी वगळता सर्व निधीतून कामे घेण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

वैयक्‍तिक लाभाच्या अडीच हजार निवडीसाठी 1 हजार 615 लाभार्थी निवड करुन पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे पाठविण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेत सेस फंडातून समाजकल्याण विभागास चालू वर्षी 4 कोटी 50 लाखांचा निधी तरतूद आहे. जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये समाजकल्याण विभागासाठी 5 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य श्रीपती सोनवणे, सुनंदा फुले, अंजनादेवी पाटील, अतुल खरात, शोभा वाघमोडे, साक्षी सोरटे, आण्णाराव बाराचारी, कविता वाघमारे, रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.