Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पंढरपूर शहरातील 123 इमारती भाविकांना राहण्यास धोकादायक

पंढरपूर शहरातील 123 इमारती भाविकांना राहण्यास धोकादायक

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 9:09PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेच्या  पार्श्‍वभूमिवर  नगरपालिका प्रशासनाने भाविकांना राहण्यास धोकादायक ठरणार्‍या जुन्या इमारती, मठ, संस्थाने यांना नोटीसा दिल्या आहेत. शहर व मंदिर परिसरात 123 धोकादायक इमारती आहेत.आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमिवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील इमारतींचे  पायाभूत परीक्षण केले होते.  शहरात बांधण्यात आलेल्या जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर काही मठ, संस्थाने यांची बांधकामे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची असल्याने त्यांच्या भिंतींना तडे जावू लागले आहेत. ऐतिहासिक श्रीमंत होळकर वाड्याचादेखील समावेश धोकादायक इमारतीत करण्यात आला असून या वाड्याच्या भिंतीला तडे गेले आहेत.  त्यामुळे हा वाडा भाविकांना वास्तव्य करण्यासाठी धोकादायक असल्याचे नगरपापलिकेने बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

शहर व मंदिर परिसरात जुनी बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही  बांधकामे घर मालक व नगरपालिकेने जमीनदोस्त केली आहेत. तर काही बांधकामांचे वाद न्यायालयात गेले आहेत त्यामुळे ती बांधकामे पाडण्यात अडथळे आले आहेत. धोकादायक बांधकामांच्या ठिकाणी नगरपालिका बांधकाम विभागाने सावधानतेची नोटीस लावली आहे. मोठे बोर्ड लावून ही इमारत वास्तव्यास धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

सद्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जुन्या इमारतींना तडे गेल्यांने त्या अधिकच धोकादायक ठरत आहेत. सदर इमारत मालकांना या ठिकाणी वास्तव्य करून नये तसेच भाविकांनी देखील वास्तव्य करून नये. जर कोणी नियम डावलून इमारतीत वास्तव्य करत असताना अनपेक्षित घटना घडली तर त्यास प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.