Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Solapur › अकरावी प्रवेशाचा हायस्ट कटऑफ 93 टक्के

अकरावी प्रवेशाचा हायस्ट कटऑफ 93 टक्के

Published On: Jul 03 2018 1:55AM | Last Updated: Jul 03 2018 1:16AMसोलापूर : प्रतिनिधी

अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी आज जाहीर झाली. त्यामध्ये वालचंद,  दयानंद, संगमेश्‍वर यासारख्या अनुदानित मोठ्या महाविद्यालयांची यादी तब्बल 85.20 टक्क्यांवर बंद झाली. विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये आयएमएसची यादी सर्वाधिक 93.20 टक्क्यांवर बंद झाली. कुचन शाळेची यादीही 73 टक्क्यांवर बंद झाली आहे. त्यामुळे सोलापुरातील 73 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाणिज्य शाखेसाठीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगली चुरस दिसली. हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची गुणवत्ता यादी तब्बल 83.80 टक्क्यांवर क्लोज झाली आहे, तर हरीभाईच्या वाणिज्य शाखेत 65.02 टक्क्यांवर गुण असणार्‍यांना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वालचंदची यादी शलाका आसवले (98.40) या विद्यार्थिनीच्या नावापासून यादीला सुरुवात झाली आहे, तर दयानंदची यादी टी.वाय. तावसे (97.80) या विद्यार्थ्याच्या नावापासून यादीला सुरुवात झाली.
अकरावीच्या सर्वाधिक 480 जागा दयानंद महाविद्यालयाला असल्याने स्वाभाविकपणे दयानंद महाविद्यालयाचा कटऑफ हा 85 टक्क्यांपर्यंत आला आहे. त्याखालोखाल संगमेेश्‍वरमध्ये  320 जागा आणि त्यानंतर वालचंद महाविद्यालयात 240 जागा आहेत. संगमेश्‍वर आणि वालचंदने विनाअनुदानित तुकड्यांचे मेरिटही 90 च्या घरात गेले आहे. मात्र एकाच विद्यार्थ्याचे नाव दोन-तीन महाविद्यालयांत लागले असल्याने दुसरी यादी 80 टक्क्यांपर्यंत घसरेल अशी  शक्यता महाविद्यालयांकडून वर्तविण्यात आली आहे.

महाविद्यालयाचे नाव         जनरल     एससी    एसटी     ओबीसी      मायनॉरिटी

वालचंद अनुदानित (विज्ञान)    90.20    82.00    74.00    89.00    45.40

वालचंद  विनाअनुदानित (विज्ञान)    90.40    74.00    87.00    89.00    60.20      

संगमेश्‍वर अनुदानित (विज्ञान)    89.40    83.60    60.60    83.80    85.20

संगमेश्‍वर वाणिज्य                              79.00    67.60    78.40    69.00    73.00

दयानंद विज्ञान        85.20    71.20    74.80    76.00    -----

दयानंद वाणिज्य        73.80    40.00    40.00    61.80    -----

आयएमएस विज्ञान        93.80    85.40    69.20    88.00    -----

हरिभाई देवकर विज्ञान        84.08    81.00    -----    79.60    -----    

हरिभाई देवकरण वाणिज्य        65.02    65.04    62.80    46.06    -----

व्ही.जी. शिवदारे कॉलेज विज्ञान    82.20    69.80    69.20    60.20    -----

सोशल उर्दू मीडियम कला        57.06    ----    ----    -----    -----

सोशल मराठी मीडियम कला    44.06    ----    ----    -----    -----

सोशल वाणिज्य        69.60    65.80    ----    -----    -----

भू. म. पुल्ली वाणिज्य        69.80    ----    ----    -----    -----

हिराचंद नेमचंद वाणिज्य     (अनु.)    83.80    74.00    65.20    80.00    -----    

हिराचंद नेमचंद वाणिज्य (विनाअनु.)    85.20    59.00    78.40    77.80    -----

कुचन वाणिज्य        65.04    ----    ----    ----    ----

कुचन विज्ञान        73.00    ----    ----    ----    ----

दुसरी व तिसरी गुणवत्ता यादी 6 व 9 जुलैला
अखेर 11 वी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून पहिली गुणवत्ता यादी 2 जुलै रोजी जाहीर झाली आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी 6 जुलै व तिसरी गुणवत्ता यादी 9 जुलै रोजी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे त्या त्या गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांनी त्या त्यावेळेस आपला प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे.


प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी इयत्ता 10 वीची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा मूळ दाखला तसेच त्याच्या दोन साक्षांकित झेरॉक्स प्रति, जातीचा दाखला, आधारकार्ड व विद्यार्थ्याचे बँक खाते पासबुक यांच्या एक-एक झेरॉक्स प्रति अशाप्रकारे कागदपत्रे लागणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी याची पूर्तता करणे गरजेचे आहे.

96 टक्के मिळविलेल्या 
विद्यार्थ्यांचा कला शाखेत प्रवेश
कला शाखेची अवस्था यंदा मात्र वाईट आहे. मोठ्या महाविद्यालयांमध्येसुध्दा कला शाखेसाठी थेट प्रवेश दिला जात असल्याने बहुतांश महाविद्यालयांत कला शाखेसाठी गुणवत्ता यादी लागलीच नाही. मात्र असे असताना शुंभग लंगदेवळे याने 96 टक्के गुण असतानाही संगमेश्‍वर महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेत कला शाखाही ‘किसी से कम नही’ हेच दाखवून दिले आहे.