Tue, Mar 26, 2019 01:41होमपेज › Solapur › सोलापूर : भाविकांच्या गाडीला अपघात; ११ जखमी

सोलापूर : भाविकांच्या गाडीला अपघात; ११ जखमी

Published On: Dec 13 2017 12:34PM | Last Updated: Dec 13 2017 12:34PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

कर्नाटकातून पंढरपूरला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. मंगळवेढा येथील बोराळे चौकात उलटून झालेल्या या अपघातात ११ जण जखमी झाले. हा अपघात आज (बुधवार दि.१३) पहाटेच्या सुमारास झाला.

मंगळवारी सायंकाळी चारचाकी गाडीतून पंढरपूरला कर्नाटकचे भाविक जात होते. मध्यरात्री १ च्या सुमारास गाडी मंगळवेढ्यातील बोराळे चौकात आली असता गाडी उलटली. या अपघातात चौडप्पा बसप्पा गिडनकटे (वय ३०), हनुमंत नागनप्पा गुंडदी (वय ३५), कमलप्पा भिमप्पा सुरनळी (वय ४०), कंदन्नप्पा पुजारी (वय ३८), हणमंतप्पा इरप्पा मुद्री (वय १०), चौडप्पा पापाचारी (वय ३०), अलप्पा कबळप्पा तलवार (वय ४०), अंमनप्पा (वय ३०), महंतेश हणमंतप्पा (वय ४०), सुरेश कोलालू (वय ५०, सर्व रा. कमलापूर, ता, नगलूर, जि, दावणगिरी, कर्नाटक) हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.