Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्याचा दहावीचा निकाल 91 टक्के

पंढरपूर तालुक्याचा दहावीचा निकाल 91 टक्के

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:14PMपंढरपूर : प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाच्या वतीने मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच  संकेतस्थळावर जाहीर झाला असून माळशिरस तालुक्याचा निकाल 91.03 टक्के लागला आहे. तालुक्यातून दहावीच्या परीक्षेसाठी 7326 विद्यार्थी बसले होते. यापैकी 6669 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील 12 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 50 शाळांचा निकाल 90 टक्केच्या पुढे लागला आहे.

पंढरपूर तालुक्यातील शाळानिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- आपटे उपलप प्रशाला पंढरपूर 91.56, कवठेकर हायस्कूल  87.25, लोकमान्य विद्यालय 80.51, रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब 79.68, यशवंत विद्यालय भोसे 94.64, गौतम विद्यालय संतपेठ 77.08, विवेक वर्धिनी विद्यालय 91.90, मातोश्री सरुबाई कन्याप्रशाला 96.87 , न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी 89.06, द.ह. कवठेकर हायस्कूल पंढरपूर 94.92, न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव 98.43, एम.एस. इंग्लिश स्कूल आंबे चिंचोली 100, अँग्लोे ऊर्दु हायस्कूल 88.23, लिंगेश्‍वर विद्यालय पुळूज 100,न्यू इंग्लिश स्कूल रोपळे 87.07, यशवंत विद्यालय पंढरपूर 100, दौलतराव विद्यालय कासेगाव 89.38 टक्के, साधना विद्यालय तावशी 92.20, श्री सीताराम महाराज विद्यालय खर्डी 92.22, श्री तुंगेश्‍वर हायस्कूल तुंगत 93.75, जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिध्देवाडी 95.55, श्री दत्त विद्या मंदीर सुस्ते 93.12, आचार्य दोंदे विद्यालय ओझेवाडी 100, सदगुरू गाडगेबाबा विद्यालय पंढरपूर 80.95 , श्रीनाथ विद्यालय भंडीशेगाव 97.43, मोहसीन विद्यालय  इसबावी 85, श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर 87.15, श्रीनाथ विद्यालय सोनके 86.11, श्री भैरवनाथ विद्यालय सरकोली 80, आण्णासाहेब पाटील विद्यालय तिसंगी 96.82, इंग्लिश स्कूल मनिषानगर 98.78, न्यू इंग्लिश हायस्कू ल करकंब 90.90, विद्यामंदिर हायस्कूल गार्डी 88.67, नूतन  विद्यालय कोर्टी 90.76, शेळवे कृषी विद्यालय 94.44, संत प्रभू प्रशाला अजनसोंड 93.33, कै. आण्णासाहेब साठे प्रशाला अनिलनगर 87.50, माध्यमिक आश्रम शाळा वाखरी 89.69, पटवर्धन कुरोली प्रशाला 87.87, के.ए. राजीव पाटील विद्यालय पंढरपूर 86.36, वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली 97.36, श्री दर्लिंग विद्यालय चळे 89, विलासराव देशमुख हायस्कूल उपरी 85.29, व्ही. माने प्रशाला नारायण चिंचोली 94.33, विद्या विकास मंदिर उंबरे 90, मातोश्री विद्यालय गणेशनगर 83.82, न्यू इंग्लिश स्कूल अनवली 100, राजीव गांधी विद्यालय फुलचिंचोली 87.80, श्री छ. शिवाजी विद्यालय मुंढेवाडी 92.59, गोपाळकृष्ण विद्यामंदिर  प्रियदर्शिनीनगर 78.78, जिजामाता विद्यालय आंबे 86.07, श्रीमंतराव काळा विद्यालय जैनवाडी 94.44, भैरवनाथ विद्यालय आढीव 97.29, ज्ञानेश्‍वर माऊली विद्यालय खरसोळी 97.67,  दर्लिंग विद्यालय मगरवाडी 92.00, भैरवनाथ विद्यालय खरातवाडी 90.32,  आदर्श कन्या प्रशाला करकंब 90.90,  सिध्देश्‍वर प्रशाला तपकिरी शेटफळ  86.66, विद्यानंद माध्यमिक विद्यालय बार्डी 96.66, श्री दुध्देश्‍वर प्रशाला मेंढापूर 92.85, पतंगराव माध्यमिक प्रशाला पळशी 92.85, गगणगिरी विद्यालय सांगवी 97.67, रेणुका विद्यालय बाबुळगांव 84.09, विद्याविकास प्रशाला टाकळी 81.66, मातोश्री रुक्मिणी गंगाराम होळकर विद्यालय व्होळी 93.54, डॉ. फाळके प्रशाला पांढरेवाडी 94.18, हनुमान विद्यालय सुपली 90.36, मातोश्री सौ. सरूबाई माने विद्यालय भटुंबरे 100, राजाराम इंग्लिश स्कूल पंढरपूर 100, रांझणी विद्यामंदिर 91.48, खेडभोसे विद्यालय 93.33, यशकिर्ती विद्यालय बुरूड गल्ली 98.66, श्री सिध्दनाथ विद्यालय सातवा मैल 83.78, माध्यमिक विद्यालय कौठाळी 91.89, कर्मयोगी माध्यमिक विद्यालय तारापूर 70.96, पेहे माध्यमिक विद्यालय 98.18, अहिल्या प्रशाला केसकरवाडी 96.03, शिरगाव विद्यालय 95.83, छत्रपती शिवाजी हायस्कूल स्टेशन रोड, 96.77, कर्मयोगी सुधाकर परिचारक पुळूज 100, रत्नमहर्षी मोहिते-पाटील माध्यमिक शिरसोडी 93.33, प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय लिंक रोड 87.69, मॉर्डन हायस्कूल पिराची कुरोली 100, कै. बाबुराव जाधव विद्यालय 75, रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय 69.44, राहुल गांधी माध्यमिक विद्यालय कोर्टी 98.41, माध्यमिक विद्यालय नांदोरे 95.34, न्यू इंग्लिश स्कूल शेवते 59.25, ज्ञानप्रबोधनी विद्यालय पंढरपूर 86.48, प्रमिला माणिकराव देशमुख विद्यालय 100, स्व. धिरूभाई आंबाणी विद्यालय शेगाव 90, राजनंदीनी माध्यमिक विद्यालय कौठाळी 91.46, माध्यमिक विद्यालय नेतपगांव 90.90, बोहाळी माध्यमिक विद्यालय, बोहाळी ता. पंढरपूर 97.82, पंचरत्न इंग्लिश स्कूल 100, पालवी ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालय 100. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेत अभिनंदन करण्यात आले. 
भाळवणी विद्यालयाचा
निकाल 89 टक्के
भाळवणी : वार्ताहर

भाळवणी (ता. पंढरपूर) येथील न्यू इंग्लिश स्कूल  ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील दहावीचा निकाल 89.06 टक्के लागला असून विद्यालयात मुलींनी बाजी मारली असल्याचे निकालावरून दिसून येते. विद्यालयात पहिले तिन्ही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. 

सन 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत  विद्यालयातील एकूण 247 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 220 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्र.   यलमार सपना संजय (96.20%), द्वितीय क्र. दोलताडे सायली विजयकुमार (93.40%),  भांगे प्रणोती दीपक, तिसरा क्र. जाधव स्वाती माधव यांनी पटकावला आहे. 
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य एन. एम. गायकवाड, स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे व सर्व सदस्य, शिक्षक, पालक यांनी केले.