Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Solapur › दहा वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

दहा वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 20 2018 10:19PMसोलापूर : प्रतिनिधी

दहा वर्षाच्या मुलीचा पाठलाग करून तिचा लैंगिक छळ करणार्‍या तरुणाविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल शाम पवार (रा. गणेशनगर, जुना पुना नाका, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. यातील  पीडित  दहा  वर्षांची   मुलगी ही सोमवारी दुपारी शिवाजी चौकातून जात असताना राहुल पवार याने तिचा पाठलाग करुन होम मैदानावरील होम  कट्ट्याजवळ तिला अडवून तिचा लैंगिक छळ केला म्हणून याबाबत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्‍त सकळे तपास करीत आहेत.

पूर्ववैमनस्यातून ब्लेडने वार करणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल पूर्ववैमनस्यातून तरुणावर ब्लेडने वार करून जखमी  करणार्‍या तिघांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर अंबादास बंदपट्टे (वय 29, रा. न्यू पाच्छा पेठ, साईबाबा चौक, सोलापूर) याच्या फिर्यादीवरून दिलीप शिवाजी बंदपट्टे, सिधू अंबादास हतगल, अनुप चंदू विटकर (रा. न्यू पाच्छा पेठ, साईबाबा चौक, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेखर बंदपट्टे  यास दिलीप बंदपट्टे व इतरांनी  पूर्वीच्या भांडणाचा रोष मनात  धरून  सोमवारी  सायंकाळी गोली टॉवरसमोर शिवीगाळ करून ब्लेडने पोटावर वार करून जखमी केले म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार  टंगसाळी  तपास करीत आहेत.