Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Solapur › आषाढी यात्रेसाठी 10 लाख बुंदी लाडू

आषाढी यात्रेसाठी 10 लाख बुंदी लाडू

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:14PMपंढरपूर :  प्रतिनिधी

आषाढी यात्रेत आलेले भाविकांनासाठी मंदिर समितीच्यावतीने 10 लाख बुंदीचे लाडू तयार करण्याचे काम हाती घेतले असून दररोज 45 ते 50 हजार गुणवत्तापुर्ण बुंदी लाडू तयार केले जात आहेत. याकरिता 77 कर्मचारी काम पाहत आहेत. 

आषाढी यात्रा सोहळ्यात आलेल्या भाविकांना मागणीनुसार महाप्रसाद म्हणून बुंदीचे लाडू विक्रीकरिता ठेवले जातात. याकरिता मंदिर समितीच्यावतीने 4 लाडू विक्री केंद्र सुरू केली आहेत. सद्या दोन लाडू विक्री केंद्रातून लाडू विक्री सुरू आहे. गर्दी वाढू लागली की अन्य दोन लाडू विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येकी 70 ग्रॅम वजनाना बुंदी लाडू तयार करण्यात आला आहे. दोन बुंदीचे लाडू पिशवीत भरले जात असून 15 रुपयेला विक्री केली जात आहे. 

आषाढी यात्रेत लाडू बनविण्याचे काम एमटीडीसी येथील लाडू केंद्रावर तयार केले जात आहेत. याकरीता सुवर्ण क्रांती महिला उद्योग सह. संस्थेला काम देण्यात आले आहे. 10 लाख लाडू तयार करण्यासाठी दि. 11 जुलैपासून सुरुवात केली असून हे काम दि. 28 जुलै पर्यंत चालणार आहे. दररोज 40 ते 50 हजार बुंदीचे लाडू तयार करण्यात येत आहेत. दोन पाळ्यात(शिफ्ट) 7 आचारी बुंदी तयार करण्याचे काम करीत आहेत. तर बुंदी लाडू बनविणे, पॅकींग करण्यासाठी 70 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याकरीता 300 व्किंटल साखर, 20 हजार लिटर शेंगदाणा तेल, 250 व्किंटल हरभरा दाळ, 700 किलो बेदाना व 1 टन वेलदोडे वापरण्यात येत आहेत.  यात्रा काळात भाविकांना पुरवण्यात येणारे बुंदी लाडू गुणवत्तापुर्ण असावेत याकरीता अन्न व प्रशासन विभाग वेळोवेळी भेट देवून पाहणी करत आहे. त्याचबरोबर येथील व्यवस्थापनाकडूनही गुणवत्ता राखण्यावर भर दिला आहे.

7 आचारी 70 कर्मचारी
दररोज 45 ते 50 हजार लाडू तयार करण्यात येत असून याकरिता 7 आचारी, तर 35 महिला लाडू तयार करण्याचे व 35 महिला लाडू पॅकिंग करण्याचे काम करत आहेत.

या साहित्याचा वापर
10 लाख लाडू तयार करण्याकरिता 300 व्किंटल साखर, 20 हजार लिटर शेंगदाणा तेल, 250 क्विटंल हरभरा दाळ, 700 किलो बेदाणा व 1 टन वेलदोडे यांचा वापर करण्यात येत आहे.