Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Solapur › जि.प.शाळेतील 1 लाख 48 हजार विध्यार्थ्यांना मिळणार गणवेश 

जि.प.शाळेतील 1 लाख 48 हजार विध्यार्थ्यांना मिळणार गणवेश 

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:05PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती, बीपीएल कुटुंबातील 1 लाख 48 हजार 295 विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी प्रती विध्यार्थी 600 रुपये याप्रमाणे 8 कोटी 89 लाख निधी  केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी हा निधी सोमवारी संबधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. 

गतवर्षी दोन गणवेशाकरिता 400 रुपयंचे अनुदान पालक व विध्यार्थी यांच्या संयुक्त बँक खात्यात देण्यात येत होते. यंदा प्रती विद्यार्थी गणवेशाकरिता 600 रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी करून, त्याची पावती शाळेतील मुख्याध्यपकाडे सादर करायची आहेत. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कम देण्यात येणार आहे. बँकेत खाते काढण्यासाठी अडचणी येत असल्याने यंदा पोस्ट कार्यालयात विद्यार्थी व पालकांची संयुक्त खाते काढण्याची मोहीम प्रत्येक शाळेत घेण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी सयाजीराव क्षीरसागर यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यातील 18 हजार 995 विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी 13 लाख 61 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील 10 हजार 529 विद्यार्थ्यांसाठी 63 लाख 17 हजार 400 रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील 10 हजार 989 विद्यार्थ्यासाठी 65 लाख 93 हजार 400 रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. 

 माढा तालुक्यातील 13 हजार 251 विध्यार्थ्याशाठी 79 लाख 50 हजार 600 रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील 20 हजार 197 विध्यार्थ्यासाठी 1 कोटी 21 लाख 18 हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील 9 हजार 505 विद्यार्थ्यांसाठी 57 लाख 3 हजार रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील 13 हजार 397 विद्यार्थ्यांसाठी 80 लाख 38 हजाराचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. 

पंढरपूर तालुक्यातील 15 हजार 182 विद्यार्थ्यांसाठी 91 लाख 9 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यातील 15 हजार 81 विध्यार्थ्यासाठी 90 लाख 48 हजार रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील 6 हजार 275 विद्यार्थ्यासाठी 37 लाख 65 हजाराचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 14 हजार 954 विद्यार्थ्यासाठी 89 लाख 72 हजाराचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.