Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Solapur › बार्शीत 1 लाख 30 हजारांची चोरी

बार्शीत 1 लाख 30 हजारांची चोरी

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:30PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याच्या घराच्या खिडकीचे तावदान उचकटून  आत प्रवेश करून रोख रक्‍कम व सोन्याचे दागिने असा एक लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉट भागात उघडकीस आली.

जिवाजी माणिक शिंगण (वय 68, रा. नाईकवाडी प्लॉट, उपळाई रोड) या सेवानिवृत्त बँक अधिकार्‍यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, 2 सप्टेंबर रोजी सर्व जण नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास जेवण करून घरातील हॉलमध्ये झोपले. दोन्ही मुले घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या दोन बेडरूममध्ये झोपले.सकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे झोपेतून उठून आतल्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून लावलाने तो उघडला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता आतल्या खोलीत असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडा असलेला दिसला व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.

चोरट्यांनी 40 हजार रुपये किमतीच्या 2 नग पाटल्या, 20 हजार रूपये किंमतीचे कानाचे फुले-झुबे, 30 हजार रूपये किंमतीचे 5 नग पिळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या त्यातील, 10 हजार रूपये किंमतीचे 2 नग चांदीचे ताट प्रत्येकी 200 ग्रॅम वजनाचे असे एकूण 400 ग्रॅम व रोख रक्‍कम  30 हजार रुपये असा एक लाख तीस हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास करण्यात  आला.

बेडरूमला असलेले लाकडी खिडकीचे तावदान उचकटून व त्याचे आतील ग्रिलचे खिळे कटावणीने उचकटून तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट उचकटून कपाटात ठेवलेले दागिने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.