Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Solapur › सोलापुरमध्ये कारचा भीषण अपघात, १ ठार ९ जखमी

सोलापूर: कारचा भीषण अपघात, १ ठार ९ जखमी

Published On: Mar 18 2018 2:45PM | Last Updated: Mar 18 2018 2:55PMनातेपुते (सोलापूर) : वार्ताहर 

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर नातेपुते शहरालगत दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात १ जण जागीच ठार झाला असून ९ जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सरपंच अॅड भानुदास राऊत यांच्या वस्तीजवळ सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

जवळा ता. सांगोला येथील काटे कुटुंब मुंबईहून  आपल्या मुळ गावी गुढीपाडव्याच्या सणासाठी इंडिका कारने निघाले होते. तर पुणे येथील घाटुळे कुटुंब पंढरपूर येथून देव दर्शन करुन स्विफ्ट कारने पुण्याच्या दिशेने जात होते. राऊत वकील वस्तीजवळ दोन्ही कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात इंडिका कारचे चालक ज्ञानेश्वर काटे यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात योगिती किरण गायकवाड (२९ वर्षे) , प्रथमेश किरण गायकवाड ( ८ वर्षे), यश किरण गायकवाड (६ वर्षे) जयश्री काटे (४० वर्षे) सर्व रा. जवळा ता. सांगोला आणि दुसऱ्या कारमधील  भामाबाई गोंविद घाटुळे (६५ वर्षे), भगवान गोंविद घाटुळे (४० वर्षे) ओंकार भगवान घाटुळे (१८ वर्षे)  शारदा भगवान घाटुळे (३८ वर्षे)  शशीकला रावसाहेब बाबर (६० वर्षे) सर्व रा. पुणे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमीवर नातेपुते ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अकलुज व फलटणला हलविण्यात आले आहे.

Tags : Man Killed In Accident , Accident In Solapur, Car Accident, Pune Pandhrur Palkhi Highway, Solapur, Sangola, Pune, Pandharpur