Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Solapur › स्मार्ट सिटीत ‘भीम अ‍ॅप’ बंधनकारक

स्मार्ट सिटीत ‘भीम अ‍ॅप’ बंधनकारक

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:10PMसोलापूर : इरफान शेख

रोखीने व्यवहार कमी करण्यासाठी भीम अ‍ॅप नागरिकांकडून डाऊनलोड करुन घेण्याची मोहीम प्रत्येक प्रशासकीय अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. कारण रोखीने व्यवहार अधिक झाल्याने जीडीपीचे नुकसान होत असल्याची माहिती आर्थिक तज्ज्ञांनी केंद्र सरकारला दिली आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बँक अधिकारी,  वसुलीला असलेले जिल्हा प्रशासनातील अधिकारी, महावितरणातील लाईट बिल भरणा केंद्र अधिकारी व कर्मचारी  नागरिकांना भीम अ‍ॅप स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी आग्रह धरत आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून  भीम अ‍ॅपचा प्रसार करण्याचे आदेश स्मार्ट सिटींना देण्यात आले आहेत.

नोटाबंदीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल व्यवहारावर अधिक लक्ष केंद्रीत केले होते.त्यासाठी सरकारने भीम अ‍ॅप निर्माण केले होते.
भीम म्हणजेच भारत इंटरफेस फॉर मनि असे त्याचे नाव आहे.छोट्या व्यवहारासाठी व छोट्या व्यापारांसाठी भीम अ‍ॅप निर्माण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंतचे एका वेळी व्यवहार किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होते.दिवसाला 40 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार भीम अप्लिकेशनमधून करता येऊ शकतो. स्मार्ट फोनधारक सोलापूरकरांनी भीम अ‍ॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करु शकता.

स्मार्ट सोलापुरातील नागरिकांकडून भीम अ‍ॅप डाऊनलोड करुन घेण्यासाठी सोलापूर महापालिकेत बँक अधिकार्‍यांची व महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत डिजिटल किंवा ऑनलाईन व्यवहार वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला.

त्यामध्ये शहरातील सर्व बँकांचे झोनल प्रतिनिधी उपस्थित होते.एका बँकेला 10 ऑगस्टपर्यंत 10 हजार नागरिकांकडून 10 हजार मोबाईलमध्ये भीम अ‍ॅप डाऊनलोड करुन घेण्याचे टारगेट देण्यात आले आहे.
भीम अ‍ॅपचा वापर कोणतीही स्मार्ट फोनधारक व्यक्ती प्ले स्टोअरमधून भीम अ‍ॅप डाऊनलोड करु शकते. एकूण 13 भाषेत  हे अप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे.हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी आदी भाषांमधून भीम अ‍ॅपचा वापर करता येऊ शकतो. 24 तास व्यवहाराची सेवा  यामध्ये देण्यात आली आहे.

कोणत्याही बँकेतून इतर कोणत्याही बँकेत पैसे जमा करता येऊ  शकते. यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) या प्लॅटफॉर्मवरुन रक्कम ट्रान्झॅक्शन होते. व्हीपीए(व्हर्च्यूअल पेमेंट अ‍ॅड्रेस) व क्यूआर कोड(क्विक रिस्पॉन्स) यामधून व्यवहार करता येऊ शकतो. आता भीम अ‍ॅपचा बोलबाला देशभरात होणार आहे.