Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Solapur › पानीव ग्रामपंचायत इमारतीचा लूक बदलला

पानीव ग्रामपंचायत इमारतीचा लूक बदलला

Published On: Dec 13 2017 2:00AM | Last Updated: Dec 12 2017 10:20PM

बुकमार्क करा

पानीव : वार्ताहर

पानीव ( ता.माळशिरस) येथील पानीव ग्रामपंचायत इमारतीची सजावट केलेली असून त्यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पानीव ग्रामपंचायत निवडणुकीत प्रकाश पाटील प्रणित श्रीनाथ विकास आघाडीने ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते. व सरपंचपदी श्रीलेखा पाटील यांची जनतेतून बहुमताने निवड झालेली आहे. येत्या 17 डिसेंबर रोजी त्या ग्रामपंचायतची सूत्रे हाती घेणार असून त्यांच्या स्वागतासाठी पानीव सचिवालयाची इमारत सज्ज होत आहे. पानीव येथे 2013 साली काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नातून व  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निधीतून पानीव येथे ग्रामसचिवालयाची देखणी इमारत उभा करण्यात आली होती.  या इमारतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक,तलाठी कार्यालये, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी, बैठक हॉलची प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे आकर्षक रंगरंगोटी व कलाकुसरीमुळे ही इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पानीवच्या सरपंच सौ. श्रीलेखाताई पाटील येत्या 17 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्याचवेळी नूतन उपसरपंचपदाचीही निवड होणार आहे.