होमपेज › Solapur › उजनीतून शेतीसाठी बोगद्यातून पाणी

उजनीतून शेतीसाठी बोगद्यातून पाणी

Published On: Feb 12 2019 1:10AM | Last Updated: Feb 12 2019 1:10AM
बेंबळे : प्रतिनिधी

उजनीतून शेतीसाठी भीमा नदी, सीना नदी आणि कालव्यातून एकाचवेळी पाणी सोडण्याचा  निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यातील एक नोव्हेंबरची पाळी सोडण्यात आली. परंतु, जानेवारी 20 सोडण्यात येणारी पाण्याची पाळी पुढे ढकलली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी 10 वा. भीमा-सीना बोगद्यातून 150 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली असून त्यात वाढ करून 950 क्युसेक करण्यात येणार आहे. 

सध्या उजनीची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. एकूण पाणीपातळी ः 492.630 मी., एकूण पाणीसाठा ः 2107.07 द.ल.घ.मी., उपयुक्‍त पाणीसाठा ः 334.26, टक्केवारी ः 23.07 टक्के. 

पुढचे पाणी मिळण्याची शक्यता कमीच

हे सोडण्यात येणारे पाणी खरेतर रब्बी हंगामातीलच आहे. पण, पुढे येणार्‍या भीषण पाणीटंचाई ची दाहकता विचारात घेऊन उन्हाळी व रब्बी याचे एकत्रीकरण करून ही पाळी होणार आहे. कारण उजनीची सद्यस्थिती विचारात घेतल्यास गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत फेब्रुवारीमध्ये  उजनी 111 टक्के भरूनही धरणाची पाणीपातळी 23 टक्क्यांपर्यंत कधीच खाली आली नव्हती. गेल्यावर्षी उजनी धरण मे महिन्याच्या अखेरीस मायनसमध्ये गेले होते. पण, यावर्षी मार्चमध्येच उजनी धरण मायनसमध्ये जाणार हे नक्‍की. त्यामुळे  एप्रिलपासून पुढे उजनीतून केवळ भीमा नदीतूनच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.