Mon, Jun 01, 2020 21:07
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पंढरपूर : भालके आणि परिचारक यांच्यातच लढत!

पंढरपूर : भालके आणि परिचारक यांच्यातच लढत!

Last Updated: Oct 10 2019 4:44PM

राष्ट्रवादीचे भारत भालके आणि भाजपचे सुधाकरपंत परिचारकपंढरपूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 20 उमेदवार असूनही मुख्य लढत ही राष्ट्रवादीचे भारत भालके आणि भाजपचे सुधाकरपंत परिचारक यांच्यातच होत आहे असे दिसते. अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांच्या बरोबरच शिवाजी काळूनगे यांची मात्र पंढरपूर शहर आणि 22 गावात फरशी ताकत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार शहर आणि 22 गावात निष्प्रभ ठरल्याचे दिसत आहे.

पंढरपूर विधानसभेसाठी बहुरंगी भारत भालके आणि सुधाकर पंत परिचारक यांच्या तगड्या लढाईत समाधान अवताडे आणि काँग्रेस बंडखोर काळूनगे यांचे अस्तित्व दिसेनासे झाले आहे. 

पंढरपूर विधानसभा निवडणुकीत 20 उमेदवार असले, तरी मुख्य लढत तिरंगी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होते. मात्र, अपक्ष उमेदवार, उद्योगपती समाधान अवताडे यांची उमेदवारी फारसी प्रभावी दिसेनाशी झाली आहे. 2014 च्या तुलनेत यंदा पंढरपूर मतदारसंघात ज्‍येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक निवडणूक रिंगणात असल्याने रंगत निर्माण झाली आहे. तालुक्यात अवताडे यांची ताकत खूपच अल्प आहे. गेल्या 5 वर्षात अवताडे यांनी शहर आणि 22 गावात फारसे लक्ष दिले नाही. पंचायत समिती निवडणुकीत अवताडे यांनी पडद्याआडून परिचारक यांच्या सोबत हातमिळवणी केल्याचे बोलले जाते. तर नगरपालिका निवडणुकीत ही अवताडे यांनी लक्ष घातले नव्हते.

एवढेच नाही तर पंढरपूरच्या प्रश्नावर अवताडे, काळूनगे कधीही बोलले नाहीत. अवताडे यांनी गेल्यावर्षी काही कार्यक्रम घेऊन आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या पलीकडे जाऊन संघटना बांधणी, दुष्काळी परिस्थितीत लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे 22 गावांसह शहरात अवताडे हे परीचारकांची बी टीम असल्याचा आरोप होत आहे. या निवडणुकीत अवताडे यांचे सुरू असलेले प्रयत्न केवळ मत विभागणीसाठीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीत अवताडे यांच्याकडे स्पर्धेतील उमेदवार म्हनून मतदार पाहताना दिसत नाहीत. 

यामुळे तालुक्यात अवताडे यांची उमेदवारी केवळ दोन्हीकडून उपेक्षित राहिलेल्या असंतुष्ट लोकांची सोय असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे 2014 साली शहर आणि 22 गावात अवताडे यांना जेवढी मते मिळाली तेवढी तरी यावेळी मिळतात की नाही याविषयीच सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी पंढरपूर शहर, तालुक्यात निवडणूक ही भालके आणि परिचारक यांच्यातच होत असल्याचे दिसत आहे. अवताडे आणि काळूनगे यांचे अस्तित्व या निवडणुकीत या भागात फारसे प्रभावी असल्याचे दिसत नाही.