Thu, Nov 15, 2018 09:33होमपेज › Satara › साताऱ्यात युवकाचा मर्डर

साताऱ्यात युवकाचा मर्डर

Published On: May 06 2018 8:12AM | Last Updated: May 06 2018 8:12AMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील मंगळवार तळे या वर्दळीच्या ठिकाणी संदीप भणगे या युवकाचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर हल्ल्यात संदीप भणगे हा जखमी झाला. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. 

प्राथमिक माहितीनुसार जुन्या भांडणाच्या करणातून हा खून झाला असून घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संदीप भणगे याच्यावर लोखंडी रॉडसह इतर शस्त्रांनी हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मर्डर झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत युवकाची माहिती घेऊन पोलिसांनी मारेकराच्या शोधासाठी पथके रवाना केली. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags : youth murder, mangalwar tale, satara, satara news