होमपेज › Satara › सातारा : खंडोबाचीवाडीमध्ये युवकाचा बुडून मृत्यू

सातारा : खंडोबाचीवाडीमध्ये युवकाचा बुडून मृत्यू

Published On: Apr 10 2018 1:40PM | Last Updated: Apr 10 2018 1:40PMलिंब : वार्ताहर

खंडोबाचीवाडी (गोवे, ता. सातारा) येथे पाणी पिण्यास गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. धनगर समाजातील असलेल्या प्रशांत गणपत चवरे (दादा, वय ३३ ) हा मेंढपाळ आपल्या सहकार्यासमवेत मेंढ्या चरण्यासाठी राऊतवाडी परिसरात गेले होते. सायंकाळच्या सुमारास प्रशांत हा पाणी पिण्यासाठी जवळच्या विहिरीवर गेला असताना तो पाय घसरून विहिरीत पडला. त्यास पोहता येत नसल्याने त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

दरम्यान प्रशांत हा बराच वेळ न आल्याने त्याचा सहकारी त्याठिकाणी आला असता प्रशांत याच्या चपला विहिरीच्या बाजूस मिळून आल्या. यावेळी तो विहिरीत बुडल्याचे समजून येताच गावातील लोकांनी त्यास पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता तो मृत असल्याचे सांगितले.

दरम्यान प्रशांतच्या निधनाने खंडोबाचीवाडी- गोवे परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व लहान मुलगा आहे.