Fri, Apr 26, 2019 03:41होमपेज › Satara › सातारा : युवकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

सातारा : युवकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

केडंबे : वार्ताहर

ओखवडी (ता. जावली) येथे पाणी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.

रवींद्र शंकर शेलार (वय 30) असे या  युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी 9 वा.च्या सुमारास घराच्या जवळच असणार्‍या सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर पाणी काढण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी तोल जाऊन तो पाण्याच्या टाकीत पडला. ही बाब लक्षात येताच रवींद्रच्या घरच्या लोकांनी उंच असणार्‍या टाकीकडे धाव घेतली.

रवींद्र पाण्याच्या टाकीत पडल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी टाकीतून बाहेर काढून त्याला उपचारासाठी केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तर पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मेढा येथे दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत रविंद्रची प्राणज्योत मालवली होती. रविंद्रच्या पश्‍चात पत्नी रुपाली, मुलगा पारस व प्रणित आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Tag : youth drawn water storage tank youth died  okhewadi satara


  •