Tue, Sep 17, 2019 22:02होमपेज › Satara › सातारा : पाझर तलावात बुडून युवक बेपत्ता(व्‍हिडिओ)

सातारा : पाझर तलावात बुडून युवक बेपत्ता(व्‍हिडिओ)

Published On: Dec 17 2017 4:42PM | Last Updated: Dec 17 2017 4:41PM

बुकमार्क करा

भुईंज : वार्ताहर 

वाई तालुक्यातील वेळे येथे भिलारवाडी पाझर तलावात बुडून युवक बेपत्ता झाला आहे. प्रशांत प्रकाश नलवडे (वय २०) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. आज सकाळी १० वाजता पोहोण्यासाठी तलावात गेला असता ही घटना घडली. 

प्रशांत बुडाल्याचे समजताच ग्रामस्‍थांनी शोध सुरू केला. मात्र, त्याचा तपास न लागल्यघने महाबळेश्वर येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. महाबळेश्वर येथील बचाव पथक घटनास्‍थळी दाखल झाले असून शोधमोहिम सुरू आहे.