Fri, May 24, 2019 21:02होमपेज › Satara › काळचौंडीत वीज कोसळल्याने युवक ठार

काळचौंडीत वीज कोसळल्याने युवक ठार

Published On: Apr 07 2018 9:06PM | Last Updated: Apr 07 2018 9:06PMम्हसवड (जि. सातारा): प्रतिनिधी

माण तालुक्यातील काळचौंडी येथे वीज कोसळल्याने एका तरूणाचा मृत्‍यू झाला. तर, एकाचा प्रकृती चिंताजणक आहे. अमोल आबा सावंत (वय 19) असे मृत्‍यू झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. तर, भूषण अनिल सावंत (वय 17) असे प्रकृती चिंताजणक असलेल्‍या तरूणाचे नाव आहे. 

काहळचौंडीत शनिवारी दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी घराशेजारील भिंतीवर बसलेले अमोल  आणि भूषण यांच्यावर वीज कोसळली. यात दोघेही बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी म्हसवड येथील रुग्णालयात दाखल केले असता भुषण याचा मृत्यू झाला. तर, जितेंद्र याची प्रकृती चिंताजणक आहे. 

दरम्यान, कुक्कुडवाड व पुकळेवाडी परिसरात  गारांचा पाऊस पडला. सायंकाळी विजांचा कडकडाटासह म्हसवड शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. वडजल,  विरळी, वळई, जांभुळणी येथेही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे हवेत काहीकाळ गारवा पसरला. परंतु, शेतामध्ये काढून ठेवलेली वैरण भिजल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. गारांमुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर, फळे गळून पडली. 
 

Tags :  satara district, lightening