Sun, Aug 25, 2019 13:03होमपेज › Satara › पोलीस मुख्यालयासमोर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस मुख्यालयासमोर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Apr 21 2018 3:46PM | Last Updated: Apr 21 2018 3:46PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या इमारतीसमोरच आज(शनिवार दि.21) दुपारी साडे बाराच्या सुमारास विष पिऊन एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे मुख्यालयासमोर काही काळ गोंधळ उडाला होता. 

विषप्राशन करणाऱ्या युवकाचे नाव गणेश बापू जमदाडे (वय २५, रा. वाई) असे आहे. या युवकाने एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्याने घरगुती कारणांना वैतागून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Tags : young man, suicide, police office satara, satara news