Thu, Feb 21, 2019 09:05होमपेज › Satara › वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक ठार

वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक ठार

Published On: Jan 07 2018 12:50PM | Last Updated: Jan 07 2018 12:50PM

बुकमार्क करा
औंध/पुसेसावळी: वार्ताहर

खटाव तालुक्यातील कळंबी येथे पुसेसावळी औंध दरम्यानच्या रस्त्यावर शनिवारी रात्री सात वाजणेचे सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत  तुकाराम बाळासो घार्गे (वय 17)  हा महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तुकाराम हा वडगाव येथील रघुनाथ घार्गे यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.11 बी.एम.9255) वडगाव रहाटणी रस्ता येथून घरातून जेवण करुन येतो असे सांगून गेला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी संतोष घार्गे यांनी औंध पोलीसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास हवालदार एस.बी.रसाळ करीत आहेत.