Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Satara › स्व. यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांची आदरांजली 

स्व. यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांची आदरांजली 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी शनिवारी विविध उपक्रमांनी साजरी झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, ना. सुभाष देशमुख, ना. महादेव जानकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,  डॉ. पतंगराव कदम,  ना. शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. 

अभिवादन करण्यासाठी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वप्निल भिंगारदेवे, रामकृष्ण वेताळ, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, जि.प.सदस्य सागर शिवदास, चंद्रकांत मदने, नगरसेवक सुहास जगताप, घनशाम पेंढारकर, भाजपा शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुदर्शन पाटस्कर, अंजल कुंभार, इंद्रजित गुजर, भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय खोत, आ. प्रभाकर घार्गे, आ. मोहनराव कदम, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री कल्लाप्पाआण्णा आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, सारंग पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील-वाठारकर,  सत्यजितसिंह पाटणकर, वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, आमदार आनंदराव पाटील, अजित पाटील चिखलीकर, पंचायत समिती सभापती शालन माळी, माजी सभापती देवराज पाटील, सदस्य प्रणव ताटे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक आप्पा माने, विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत यादव, सादीक इनामदार, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, नंदकुमार बटाणे, आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल,  विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माने, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी यशवंत डांगे, विनायक औंधकर, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

रंगीबेरंगी फुलांनी समाधी सुशोभित करण्यात आली होती. समाधी स्थळावर महिला भजन मंडळाचे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. शालेय विद्यार्थी, नागरिकांची दिवसभर येथे वर्दळ होती.  दरम्यान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने आणलेल्या यशवंत समता ज्योतीचे स्वागत खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.