Thu, Jul 18, 2019 08:22होमपेज › Satara › सातार्‍यात दोघांकडून मिठाईच्या दुकानाची तोडफोड

सातार्‍यात दोघांकडून मिठाईच्या दुकानाची तोडफोड

Published On: Jan 12 2018 8:49PM | Last Updated: Jan 12 2018 8:49PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

येथील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ रिक्षामधून आलेल्या दोन युवकांकडून मिठाईच्या दुकानावर दगड फेक केली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानातील फ्रिजसह इतर साहित्यांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तोडफोडीचे कारण समजले नसून घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले आहेत. 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, राजवाडा येथून यादोगोपाळ पेठेतून समर्थ मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. गोल मारुती मंदिरासमोर मिठाईचे दुकान आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रिक्षातून आलेल्या दोन युवकांनी दुकानावर दगड व फरशी मारून दुकानाच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेने परिसरातील वाहतूक ठप्प झाली तर दुकानातील कामगार घाबरुन गेले. यावेळी संशयित युवकांनी दुकानातील फ्रिज रस्‍त्‍यावर फेकून दिला.