Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Satara › कराड : कृष्णा विद्यापीठात 6500 चौरस फूट रिबन; लिम्का बुकमध्ये नोंद

कराड : कृष्णा विद्यापीठात 6500 चौरस फूट रिबन; लिम्का बुकमध्ये नोंद

Published On: Feb 03 2018 5:13PM | Last Updated: Feb 03 2018 5:13PMकराड : प्रतिनिधी

येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या प्रांगणात तब्बल 6 हजार 500 चौरस फूट लांबीची भव्य रिबन साकारली. या भव्य रिबनवर विद्यार्थ्यांसह डॉ्नटर्स, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी गुलाबी रंगात भिजवलेल्या आपल्या हातांचे ठसे उमटवून अनोख्या जनजागृती केली. पश्चिम महाराष्ट्रात कॅन्सर जागृतीसाठी अशाप्रकारे अभिनव पद्धतीने झालेल्या या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’कडूनही घेण्यात आली आहे.

मुंबई येथील ‘झुवियस लाईफसायन्सेस’च्या सहकार्याने ‘पिंक स्ट्रीट’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. भोसले यांच्यासह विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, कृष्णा फौंडेशनच्या संचालिका गौरवी भोसले, विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल डायरे्नटर डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, निमीष ठक्कर आदी मान्यवरांनी स्वत: या रिबनवर गुलाबी हातांचे ठसे उमटवून या उपक्रमाचे उद्घाटन केले.