Sat, Aug 24, 2019 19:37होमपेज › Satara › सातारा : दोन शिक्षकांकडून शिक्षिकेचा विनयभंग

सातारा : दोन शिक्षकांकडून शिक्षिकेचा विनयभंग

Published On: Jul 06 2018 2:10PM | Last Updated: Jul 06 2018 2:10PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील एका शाळेत शिकवणार्‍या दोन शिक्षकांनी शिक्षिका असणार्‍या महिलेचा वारंवर विनयभंग केला. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षकाकडून शिक्षिकेचा विनयभंग झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, पहिल्यांदा विनयभंग केल्यानंतर शिक्षिका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना संशयिताने हातापाया पडून, माफी मागून तक्रार न देण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी 32 वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनंतर संदेश रघुनाथ कळबटे (रा.खंडोबाचा माळ) व चंद्रकांत रतन रोकडे (रा.जानाई मळा, सातारा) या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित दोन्ही शिक्षक सातार्‍यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच तक्रारदार महिलाही एका शाळेत शिक्षिका आहे. 2010 साली संबंधित यातील एका शिक्षकाने शिक्षिकेचा हात पकडून विनयभंग केला. या घटनेत शिक्षिकेने त्या शिक्षकाला प्रतिकार करुन तेथून सुटका करुन घेतली. अखेर त्या शिक्षिकेने त्याचवेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला व पोलिस चौकीत धाव घेतली. शिक्षिका तक्रार देणार या कल्पनेने शिक्षक घाबरुन गेला व त्याने हातापाया पडून तक्रार न देण्याची विनंती केली. तसेच भविष्यात पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितले.

या घटनेवर 2010 साली  पडदा पडल्यानंतर परत यातील दोघा संशयित शिक्षकांनी त्या महिला शिक्षिकेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी पुन्हा दि. 1 मे 2018 साली गैरवर्तन करुन विनयभंग केला. अखेर सर्व त्रासाला कंटाळून शिक्षिका असणार्‍या महिलेने पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली.