Tue, Jul 16, 2019 21:46होमपेज › Satara › कोयनानगर : व्हॉटस्अॅपवरील प्रेमसंदेशावरुन विनयभंगांचा गुन्हा

कोयनानगर : व्हॉटस्अॅपवरील प्रेमसंदेशावरुन विनयभंगांचा गुन्हा

Published On: Jan 14 2018 5:54PM | Last Updated: Jan 14 2018 5:53PM

बुकमार्क करा
पाटणः प्रतिनिधी 

कोयनानगर मधील रासाटी येथील विजय धनाजी जाधव (वय ३५) याने एका महिलेला प्रेमाचे संदेश व्हॉटस् अॅपवरुन पाठवले. हे कृत्य त्याला महागात पडले. त्या महिलेने विजय विरुध्द विनयभंग केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत केली आहे. 

या सर्व प्रकरणाबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित महिलेला विजय जाधव याने मोबाईल व्हॉटस् अॅप वरून अनेक प्रेमसंदेश पाठविले होते. यासंदर्भात या महिलेने कोयनानगर पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी विजय जाधव याच्याविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार शिकलीकर हे करीत आहेत.