Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Satara › फलटणमध्ये शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू

फलटणमध्ये शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू

Published On: Jan 04 2018 9:26AM | Last Updated: Jan 04 2018 9:26AM

बुकमार्क करा
फलटण :  प्रतिनिधी 

शिवाजी रोडवर असलेल्या मोठ्या टॉवर लाईनचा शॉक लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता घडली. शोभा मनोज घाटे (वय 40) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

शोभा घाटे या घराच्या गच्चीवर धुणे वाळत टाकण्यासाठी गेल्या असताना त्यांना टॉवर लाईनचा जबरदस्त शॉक लागला. हा शॉक इतका जबरदस्त होता की घाटे यांच्या शरीराने पेट घेतला. त्यात त्या जवळ जवळ 80 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती फलटण पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.