Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Satara › ब्रिटिश राजवटीचा साक्षीदार कात टाकतोय

ब्रिटिश राजवटीचा साक्षीदार कात टाकतोय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड: प्रतिनिधी

ब्रिटिश राजवटीचा साक्षीदार असलेला येथील जुन्या कोयना पुलाच्या मजबुतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. हा ऐतिहासिक पूल कराडकरांच्या सेवेत नव्याने रूजू होणार असून अवजड वाहतूक वगळता सर्व वाहनांसाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पुलाच्या मजबुती करणाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पामार्फत हे काम सुरू आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकालात येथील ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हा पूल शंभर वर्षांपूर्वीचा आहे. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबतचे पत्र इंग्लडमधून भारतात पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. तेंव्हापासून या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 30 जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे. वाहनधारकांनी पुणे-बंगलूर महामार्गावरील नवीन कोयना पुलाचा कराड शहरात येण्यासाठी वापर करावा, असे आवाहन  बांधकाम विभागाने केले आहे. 

ब्रिटिशांनी सव्वाशे वर्षापूर्वी बांधलेला जुना कोयना पूल अजुनही दुचाकीसाठी सुरु होता. ब्रिटिशांनीच पुलाला 100 वर्षाहून अधिक काळ झाल्याने तो वाहतुकीस बंद करावा असे पत्र पाठवल्याचे बांधकाम विभागातून सांगितले जाते. त्यामुळे संबंधित पुलावरुन चारचाकीसह अवजड वाहतूक 1976 पासून बंद करण्यात आली होती. या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू झाल्याने अवजड वाहतूक वगळता दुचाकी, चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूल नव्या रूपात पुन्हा कराडकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. 

Tags : Satara, Satara News, witness, British monarchy, strengthening, old Koyna bridge,  work, fast


  •