Mon, Aug 19, 2019 18:25होमपेज › Satara › ‘पोलिसबॉय’सह गांजा ओढणारी टोळी ताब्यात

‘पोलिसबॉय’सह गांजा ओढणारी टोळी ताब्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

चार भिंतीकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका मठामध्ये गांजा ओढत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी धाड टाकून 10 संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, संशयितांमध्ये एकजण ‘पोलिस बॉय’ असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

विकास गवळी, संजय लोखंडे, अंकुश शेलार, जयंत पवार, गजानन आवळे, अक्षय कांदेकर, महेश पवार, रोहित खंडजोडे, रवीद्र पाटोळे, सनी कांबळे (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी शहरानजीक एका मठामध्ये गांजा ओढत असणारी टोळी बसली असल्याची माहिती शहर पोलिसांनी समजली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे एक पथक तयार करुन एक वाजण्याच्या सुमारास मठामध्ये धाड टाकण्यात आली. पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती समजताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अखेेर पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर परिसराची झडती घेण्यात आली.

पोलिसांना घटनास्थळावरुन गांजा, चिलीम व इतर साहित्य आढळून आले असून ते जप्‍त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व संशयितांना पोलिस व्हॅनमध्ये घातले. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात बघ्यांची अक्षरश: गर्दी उसळली होती. पोलिसांनी सर्व संशयितांना शहर पोलिस ठाण्यात आणले यावेळी संशयितांमधील एक युवक पोलिसाचा मुलगा असल्याचे धक्‍कादायकरित्या समोर आले. 

संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असून पोलिस अहवालाची प्रतीक्षा करत होते.  दरम्यान, रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू शेख, पोलिस हवालदार निलेश गायकवाड, समीर कर्णे,  सुशील भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags : satara, satara news, Ganja Smoke Gang, with Police Boy,  possession,


  •