Wed, Feb 20, 2019 05:04होमपेज › Satara › पसरणी घाटात वणव्यामुळे  वनसंपदा नष्ट 

पसरणी घाटात वणव्यामुळे  वनसंपदा नष्ट 

Published On: Mar 07 2018 7:59PM | Last Updated: Mar 07 2018 7:59PMवाई : प्रतिनिधी

वाई-पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापुढे बुधवारी सायंकाळी अज्ञाताने डोंगरात वनवा पेटविल्याने वनसंपदा मोठया प्रमाणात नष्ट झाली. ही आग रस्त्यापर्यंत आल्याने पाचगणी, महाबळेश्‍वरकडे जाणार्‍या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. 

वणव्यामुळे काही ठिकाणी वाहने थांबून पुन्हा मार्गस्थ होत होती. डोंगरातील अनेक दुर्मिळ वनस्पती व झाडे या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडली. अनेक प्राणी व पक्ष्यांचाही या वनव्यात मृत्‍यू झाला. गेल्या वर्षभरापासून अनेक वृक्षप्रेमी व पक्षीप्रेमी या ठिकाणी झाडांचे व पक्षांचे संगोपण करीत आहेत. पक्षांसाठी झाडावर पिण्याच्या पाण्याची भांडी बसविण्यात आली आहेत. ही भांडीही या आगीत जळून खाक झाली. या वणव्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, संबंधित अज्ञाताचा शोध घेवून त्याच्यावर वनविभागाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.