होमपेज › Satara › औंधमध्येच वारंवार वीज का पडते?

औंधमध्येच वारंवार वीज का पडते?

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:19PMऔंध : वार्ताहर

औंधसह परिसरात वारंवार वीज पडण्याच्या घटनांमुळे औंधवासिय चिंतेच्या सावटाखाली असून वारंवार पडणार्‍या वीजेचे गूढ कायम आहे. 

ऊन्हाळी पाऊस म्हटले की, वीजेचे तांडव आलेच. पण, मागील तीन वर्षांपासून वादळी पाऊस म्हटले की औंधकरांच्या अंगावर शहारे उभे रहात आहेत. औंध परिसरात वीज पडण्याच्या वाढत्या घटनांमुळे सध्या वीज हा विषय  चिंंतेेेचा व चर्चेचा बनला आहे.   

गत दोन दिवसांपासून औंध व परिसरात गारा, वादळी वारे, पावसाने थैमान घातले आहे.  वीज औंधभोवतीच का पिंगा घालत आहे ? याचे कोडे मात्र उलगडेना, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षात  वीज औंध गावच्या पूर्वेकडील गावानजीकच्या दाभाडे यांच्या गोडाऊननजीक पडली होती तसेच मूळपीठ डोंगरावरील मंदिर, गावातील एका नारळाच्या झाडावर तसेच दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीनजीकच्या एका झाडावर वीज पडली होती. यामध्ये  कोणत्याही प्रकारची हानी व नुकसान झाले नसले तरी वीजेचा हा पिंगा औंधभोवतीच का घुटमळतोय? याचे गूढ मात्र वाढले आहे. अन्य कारणांनी हे घडत नाही ना? हाही संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या घटनांकडे शास्त्रीय पध्दतीने पहाणे गरजेचे बनले आहे.

तांब्याच्या तारेचा परिणाम?

औंध येथील दीपमाळेवर तडितवाहक व तांब्याची तार बसविल्याने औंधमध्ये वीज बांधून ठेवल्याची धारणा पंचक्रोशीतील रहिवाशांमध्ये मागील अनेक दशकांपासून आहे.  ज्यावेळी वीजांचा कडकडाट निर्माण होतो त्यावेळी शक्यतो लिंबाचे झाड व अन्य झाडाखाली थांबू नये तसेच वीजेची उपकरणे, मोबाईल व अन्य वीजवाहक साधनांपासून दूर रहावे व ही साधणे बंद करून ठेवावीत.

 

Tags : satara, Aundh, Aundh news, lighting,