Fri, Jan 18, 2019 12:55होमपेज › Satara › दोनशे जणांना वाचवणाऱ्या देवदूत महेश साबळेचा गौरव 

दोनशे जणांना वाचवणाऱ्या देवदूत महेश साबळेचा गौरव 

Published On: Jan 24 2018 3:26PM | Last Updated: Jan 24 2018 3:38PMसातारा : प्रतिनिधी

मुंबईतील लोअर परेलमधील अग्नितांडवातून दोनशे जणांची सुटका करणारा सातारचा देवदूत महेश साबळेची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारासाठी निवड झाली. 10 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 21 हजार रोख, सन्मानपत्र आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

गेल्या महिन्यात मुंबईतील लोअर परेल येथे भीषण अग्नितांडव झाले होते. या अग्नितांडवातून 200 जणांची सुटका करणार्‍या महेश साबळे याच्या सतर्कतेमुळे लोअर परेलमधील खोलीतून 200 जणांची सुटका झाली. महेश साबळे हा सातारा तालुक्यातील खालची पिलाणी येथील रहिवाशी आहे.  

त्याच्या शौर्यगाथेची दखल घेऊन नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने महेशची ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारासाठी निवड झाली. या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. 

संबंधित बातमी 

‘जीव अडकले होते म्हणून दार तोडले’